नवी मुंबई ; राजेंद्र पाटील : मुंबईकरांच्या ताटातील डाळ किरकोळ बाजारात किलोमागे 120 रुपयांपर्यंत कडाडली असून, आवक घटल्यामुळे ही महागाई पचवावी लागत असल्याचे म्हटले जाते.
एपीएमसीचा घाऊक बाजार आणि किरकोळ बाजारातील डाळींच्या दरात किलोमागे 22 ते 36 रुपयांचा फरक आहे.एपीएमसीतील घाऊक दाणा बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत डाळींच्या दरात किलोमागे 7 ते 14 रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात मात्र डाळींच्या दरात थेट 40 ते 45 टक्क्यांनी वाढ झालेली दिसते. रोजच्या जेवणातील वरणासाठी लागणारी तुर डाळ घाऊक बाजारात 90 रुपये तर किरकोळ बाजारात 120 रुपये किलो आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेलसह रायगड जिल्ह्यांत रोज किमान 90 ते 110 गाडी डाळींचा पुरवठा एपीएमसी घाऊक बाजारातुन होतो. राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातुन दरवर्षी होणारी डाळींची उत्पादनात अवकाळी पावसाने मोठी घट झाली. शिवाय इंधन दरवाढ याचा एकत्रित परिणाम डाळी महागण्यात आला.
एपीएमसीतील डाळींची आवक
डाळींचे प्रकार 19 एप्रिल 2021 19 एप्रिल 2022
उडीद दाळ 3346 715
मुगदाळ 10175 2050
हरभरा डाळ 3511 840
मसूर डाळ 2505 2819
तुरडाळ 12993 4843