केतकी चितळे हिची शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट; कवितेद्वारे असभ्य शद्बात टीका – पुढारी

New Roblox trojan will land you with a nasty PC infection
New Roblox trojan will land you with a nasty PC infection
May 13, 2022
How to find the Claymore in Elden Ring | Digital Trends
How to find the Claymore in Elden Ring | Digital Trends
May 13, 2022
केतकी चितळे हिची शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट; कवितेद्वारे असभ्य शद्बात टीका – पुढारी


पुणे; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) ही आपल्या सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तिच्या पोस्टमध्ये नेहमी असभ्य भाषा आणि शिव्या पहायला मिळतात. अशा अनेक पोस्टमुळे ती अनेकदा चांगलीच ट्रोल देखिल झाली आहे, तसेच तिला अनेकांची टीका देखिल सहन करावी लागली आहे. आता तिने थेट राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना टार्गेट करत त्यांच्यावर असभ्य आणि अर्वाच्च शद्बात टीका केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये एक काव्य लिहित अत्यंत खालच्या शद्बात शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एक कविता पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने सर्वच मर्यादा ओलांडल्याचे पहायला मिळते.

“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll”

केतकी चितळे

अशा स्वरुपाची शरद पवार यांची अत्यंत खालच्या शद्बात निंदा करणारी व असभ्य भाषेचा वापर करण्यात आलेली कविता केतकी चितळे हिने पोस्ट केली आहे. सोबत या कविते खाली ॲडव्होकेट नितीन भावे असे ही कविता लिहणाऱ्याचे नाव लिहले आहे.

अशा पोस्ट नंतर पुन्हा एकादा अभिनेत्री केतकी चितळे नव्या वादात सापडली आहे. या पोस्टनंतर तिच्या पेजवर अनेक कमेंट पडत आहेत. या कमेंटमध्ये अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. तसेच काहींनी तिच्याप्रमाणे अत्यंत खालच्या आणि गलिच्छ शद्बात टीका केली आहे.

 

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.